मंगळवार, १६ मार्च, २०२१

विचार

विचार शब्द जरी ऐकू आला तरी डोक्यात , मनात विचारांचा बाजार कसा भरून जातो कळत देखील नाही. सकळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असा एक क्षण देखील जात नाही की विचार नाही आला जाईल तिथे विचार आहेच सावली माणसाची साथ सोडेल पण 'विचार' विचारही करवत नाही...

 खरचं माणसाचं आयुष्यच किती विचार करण्याजोगे आहे. गरीबातल्या गरीब माणसाकडे पैसे कमी तरीही त्याच्या कडे विचार आहे आणि इकडे श्रीमंत माणसाकडे पैसे असूनही विचार काही पाठ सोडत नाहीत. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर सहज , सुखी , विचार मुक्त जीवन आहे असा व्यक्ती आताच्या काळात तरी शोधून सापडणं जरा कठीणच..!

 थोडक्यात पैसा हा यातला मुद्दा नाहीच पण तात्पर्य एवढंच ज्याच्याकडे आहे तो तर पैश्याने विकत घेऊन त्यावर विजय मिळवून विचार मुक्त जीवन जगू शकत नाही तर गरीब त्यावर मात करून जगू शकत नाही . फक्त एवढंच आहे कोणी किती कुठला विचार कधी करावा हे मात्र ज्याच्या त्याच्या हातात नक्की आहे , अन त्यावरच सगळा खेळ अवलंबून आहे.

 माणूस ही एक असा विचित्र प्राणी आहेना कितीही मिळालं तरी समाधानी नाहीच , आज सायकल मिळवली तर उद्या बाईक कशी मिळेल याचा विचार करीत बसेल कर्माने तेही मिळवेल पण अजून अपेक्षा वाढतील अन उद्या त्याहूनही मोठी गाडी मिळेल याच्या विचारात पुन्हा गुरफटून जाईल. संपुर्ण आयुष्यच विचारांनी भरून गेलंय . अगदी लहानतल्या लहानापासून ते अगदी मरेपर्यंत प्रत्येक माणूस या विचारांचं ओझं घेऊनच समाजात वावरत असतो. अर्थात आता जो चांगले विचार घेऊन पुढे जातो त्याचे भलेच झालेले बघायला मिळेल, परंतु या विचित्र , नकारात्मक विचारांपायी कित्येक जणांनी आपले जीवन संपवून घेतलेले देखील बघायला मिळते. खरच हा त्यावरचा पर्याय असेल? आपले विचार संपवून आपल्या मागे असलेल्या आपल्याच लोकांचे विचार वाढवणे... असो हाच मुद्दा आहे की ज्याला सगळ्यात जास्त महत्व दिले पाहिजे कोणता विषयाचा किती आणि कसा विचार केला पाहिजे.

  तसे बघायला गेलं तर विचार सोडून दे नको करुस एवढं काय हे बोलणंही सोपय की , अवघड तर काहीच नाही त्यात! पण ह्या बोलण्याचाही रागही येतो आजकाल कित्येक जणांना . पण वास्तविक पाहता त्यात कठीण असे काही नसतेच , माणूस ज्या गोष्टी होणार असतात , ज्या आपल्या हातात नाहीत  अश्यांचा तर विचार करतच बसतो पण जे खरच  करण्यासारखं असत ते मात्र यातून राहूनच  जातं.

  त्यातही एखाद्याच चांगला चालल असेल तर तेही माणसाला पाहवणार नाही त्यातही तो तुलना करून विचारच करत बसणार हे नक्की. आणि यातून तो स्वतःचेच किती मोठे नुकसान करून घेतो हे मात्र त्याला शेवटी वेळ हातातून गेल्यावरच कळते.

  विचार करावा अन जरूर प्रत्येक गोष्ट विचार करूनच केली पाहिजे हे मात्र नक्की. त्याशिवाय भविष्य कसे घडेल हो.! परंतु झालेल्या गोष्टी उगाळून त्यावरच विचार करत राहण्यापेक्षा  त्याहूनही काहीतरी असा विचार करायला हवा की ती गोष्ट पहिल्यापेक्षा अधिक सुंदर होईल. खरंतर एखाद्या गोष्टीचा , परिस्थितीचा मग भलेही ती चांगली असो वाईट असो त्याचा विचार हा सकारात्मकतेने करून ती गोष्ट चांगल्या परीने पूर्णत्वास कशी नेता येईल हा विचार केला तर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

  मान्य आहे खडतर आहे कठीण आहे पण याही पलीकडे चांगला विचार करून पुढे जाणे हेही आपल्याच हातात आहे .  कधी कधी विचार चांगले असूनही सर्व काही साध्य होईलच असे नाही पण सकारात्मकतेने केलेल्या विचारांचा फायदाच होईल हे मात्र नक्की. आणि एक नवीन उमेद मिळेल की ती गोष्ट पाहिल्यापेक्षाही अधिक सुंदर होईल...

   असो बाकी प्रत्येकाचे विचार, विचार करण्याचा दृष्टिकोन  शेवटी वेगळाच. पण विचार मात्र नेहमी असेच असावे की एखाद्याला नवीन आशा , उमेद देणारे नक्की असावेत..!


"प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधण्याचा नक्की प्रयत्न करा, सकारात्मकता ही एक चांगली निवड आहे , शेवटी आपल्या जीवनाचा आनंद हा आपल्याच विचारांच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतो." 

     

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विचार

विचार शब्द जरी ऐकू आला तरी डोक्यात , मनात विचारांचा बाजार कसा भरून जातो कळत देखील नाही. सकळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असा एक क्षण देखील...