प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
प्रेम म्हणजे अंतर्मनाला स्पर्श करण्याची एक अद्भुत कला. एक सुखद अनुभूती. तर आयुष्यातला एक सुंदर प्रवास म्हणजेच प्रेम. जीवनातील सारी धावपळ , कष्ट आणि सर्वकाही शेवटी एकाच गोष्टीवर केंद्रित होतात ते म्हणजेच प्रेम...
प्रेम म्हणजेच आपल्याला अदृष्य आकर्षणच म्हणावं लागेल. दोन व्यक्तींमध्ये असेल तर ते प्रेम, पालक आणि मुलांमधील प्रेम म्हणजेच काळजी, देवावर असलेल प्रेम म्हणजेच भक्ती, एखाद्या गोष्टीवर असेल तर जिद्द आणि आवड, राष्ट्रावर देशावर असेल तर देशभक्ती, आणि जर शरीरावर असेल तर ती वासना...
प्रेम म्हणजे अशी एक गोष्ट की तेथे शेवटी सर्व विचार , सर्व इच्छा एकाच ठिकाणी केंद्रित होऊ लागतात. प्रेम म्हणजे आपला आणि परका यातील वाद मिटवणारा दुवा सुद्धा म्हणता येईल. जेव्हा प्रेम हे हृदयाच्या गाभ्यातून येतं तेव्हा ते पवित्र बंधन निर्माण करतं. आणि ह्याच प्रेमाची ताकद माणसाला अगदी काहीही करायला भाग पाडते.
प्रेमाने सार जग जिंकता येतं अस म्हणतात ते उगाच नाही. प्रेम दिलं तर ते दुपटीने परत नक्कीच मिळतं. या जगात प्रेम नकोय असा कोणीच नाही फक्त ते प्रत्येकाच्या व्यक्त होण्यावर अवलंबून असत एवढंच. मग ते प्रेम अगदी प्रियकर प्रेयसी मधलं असो, प्राण्यांवर असो, निसर्गावर असो, अथवा इतर कोणावरही ते जेवढं द्याल तेवढं तर मिळतच परंतु त्यापेक्षाही जास्तच मिळत. एवढं नक्की..!
प्रेम म्हणजे काही व्यवसाय किंवा देवाण घेवाण नाही. "प्रेम म्हणजे एक निस्वार्थ, निरपेक्ष आणि हो महत्वाचं म्हणजे एक पवित्र भावना आहे." प्रेमात अहंकार असूच शकत नाही मुळात म्हणजे जेथे अहंकार असतो तेथे प्रेम असूच शकत नाही.
प्रेम म्हणचे फक्त प्रेम च असतं त्यामागे कोणताही स्वार्थ , द्वेष , इतर कुठलीच भावना असूच शकत नाही. "प्रेमात असते ती एकच गोष्ट म्हणजे समोर असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील एक निरागस हसू..!"
प्रेम म्हणजे फक्त ती व्यक्ती आपल्या सोबत असणे असे नाही, प्रेम म्हणजे त्या व्यक्तीविषयी आदर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे प्रेमात आकर्षण असू शकतं पण आकर्षण म्हणजे प्रेम असू शकत नाही.
खरंतर प्रेमाला कोणतीच अशी विशिष्ट व्याख्या नाही. कारण प्रेम हे दाखवून , सांगून करण्याची गोष्ट नाहीच. प्रेम म्हणजे जाणून घेण्याची, समजून घेण्याची कला आहे आणि ज्याच्याकडे ही कला त्याला त्याची सुंदर अनुभूती ही मिळतेच. प्रेमाला कोणतीच भाषा , रंग नाही परंतु प्रेम ही एक अभिलाषा आहे. प्रेमात कोणतीच इच्छा , आकांक्षा अशी नसतेच फक्त निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम मिळावं हीच एक आशा कायम असते. अजून हवं तरी काय असतं प्रेमात..!
प्रेम म्हणजेच एकनिष्ठा. प्रेमाची सुरुवात कोठून होते हे सांगणे जरा कठीणच पण एकदा प्रेम जाणवले की त्यापासून दूर जाणे केवळ अशक्यच. "प्रेम म्हणजे निरपेक्ष त्यामुळे जेवढं आपल्याकडून असेल तितकेच ते समोरच्याकडून असेल ही भावना जरा चुकीचीच. कारण प्रेम एकतर्फी सुद्धा नक्की असू शकते."
प्रेम म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रेयसीतच असेल असे नाही भावा बहिणितील , देशावर असलेल प्रेम , आपल्या आवडत्या वस्तूवर सुद्धा प्रेम नक्कीच असू शकतं, आणि प्रत्येक आई वडिलांचं आपल्या मुलांवर तर अपार प्रेम असतंच की.!
"प्रेमाचं एक सुंदर उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा."
जरी श्रीकृष्णाची पत्नी ही रुक्मिणी असली तरी त्याच प्रेम मनातून एकच होत ते म्हणजे राधा. अर्थात हे सर्व पुराणांमध्ये आहे त्यामुळे सर्वांना माहीतच आहे. आणि राधाकृष्ण हे नाव आपण आजही घेतोच. राधाकृष्ण म्हणजेच प्रेमाचं दुसरं नाव म्हणायला हरकत नाही.
प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या आवडलेल्या , मनाला भावलेल्या काही ओळी लिहायला नक्की आवडतील
"एक एहसास है जिसे रूह से महसूस करो।
प्यार को प्यार ही रहने दो,
कोई नाम न दो।"
" प्यार कोई बोल नही, प्यार आवाज नही,
एक खामोशी है, सुनती है कहा करती है,
न यह बुझती है, न रुकती है, न ठहरी है कही,
नूर की बूंद है, सदियोंसे बहा करती है..!"
अजुन काय लिहावं प्रेमावर..? प्रेम हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे, जाणून घेण्याची गोष्ट आहे.
विषय सुंदर आहे 💯
उत्तर द्याहटवा♥️💯
उत्तर द्याहटवा