'मन' शब्दच किती जवळचा वाटतो. खरंतर तर मन नावाचा ना कुठला अवयव आहे ना कुठले इंद्रिय आहे आपल्या शरीरात. तरी अगदी रोजच्या जीवनात किती सहजतेने वापरतो हा शब्द आपण.
खरंतर मन बघायची गोष्ट नसून ते अनुभवण्याची, जाणून घ्यायची गोष्ट आहे. आपल्या डोक्यात तर हजारो विचार येत असतात ते येतात न कधी जातात हे तर कळत सुद्धा नाही कधी कधी. पण मनात जे विचार येतात ते आपल्याला स्वतःहून वाटणारे, काहीतरी आकर्षण असणारे, कश्याबद्दल तरी उत्सुकता, कुतूहल निर्माण करणारे विचार हे नक्कीच मनातून येतात व ते राहतात ही.
मन हे अगदी पाण्याच्या प्रवाहासारखे असते मनात येणारे विचार जर अडवले तर ते पुन्हा कुठल्या न कुठल्या मार्गाने नक्कीच पुन्हा येणार. जसे पाणी त्याचा मार्ग शोधत आपला प्रवास सुरू ठेवते तसेच विचार ही कधीच थांबत नाहीत, अन जर मनात येणाऱ्या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा उद्रेक होऊन त्रास मात्र नक्की होणारच. कितीही ठरवले तरी एकवेळ डोक्यातून काही विचार जातील पण मनातले विचार मात्र कधीच दुर्लक्षित करता येत नाहीत.
काहींचे मन तर खूपच हळवे असते तर काहींचे खूप कठोर. अर्थात त्यामागेही काहीतरी कारणे नक्कीच असतात. पण एक मात्र नक्की असते कुठलाही व्यक्ती कुठलीही कृती त्याला मनापासून पटल्याशिवाय कधीच करत नाही.
अनेक विचार येतात, खरंतर खूपच येतात.. काही खरच खूप चांगले असतात तर काही निव्वळ निरुपयोगी जे मनाला पोखरून टाकणारे असतात आणि कधी कधी तर चांगले विचार येऊन देखील कळत नाही. कारण मन ते समजून घ्यायला तयारच नसते हा झाला प्रत्येकाच्या अनुभवाचा प्रश्न. मनात येणारा प्रत्येक विचार हा काहीतरी कारण असल्याशिवाय नक्कीच येत नाही. फक्त तो आपण कसा समजून घेतो कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर सगळं अवलंबून असतं. जर चांगले नजरेतून बघितला तर नक्कीच तो विचार पूर्णत्वाला जातो अन तशीच ऊर्जा स्फूर्ती ही मिळते, पण जर तोच विचार वाईट दृष्टिकोनातून बघितला तर नक्कीच ते काम पण होत तर नाहीच वर त्रास होतो तो वेगळाच. आणि याचा परिणाम होतो तो म्हणजे 'मानसिकतेवर'. एकवेळ माणूस शारीरिक दृष्ट्या कमजोर असला तर नक्कीच बरा होईल पण जर माणूस मानसिक दृष्ट्याच खचला तर त्याला कोणतंच औषध बरं करू शकतच नाही.

काही विचार तर चांगलेही असतात पण आपलं मन नेहमीच अधिक चांगला, अधिक सुखाच्या शोधत फिरत असतं. त्या अधिक चांगल्याच्या नादात आपण आपल्या कडे असलेले खूप काहीतरी नक्कीच गमावून बसतो . पण जेव्हा हे लक्षात येते तेव्हा वेळ गेलेली असते.
माणसाला एकाच वेळी खुपसाऱ्या गोष्टी हव्या असतात.अन जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्या मिळतात सुद्धा .
गरज असते ती फक्त आलेला विचार सकारत्मकतेने बघण्याची, समजून घेण्याची, कष्टाची तयारी ही तितकीच लागतेच. त्यामुळे फळाची अपेक्षा न करता 'प्रयत्न' करणं हे तर नक्कीच आपल्या हातात असत. बाकी यश अपयश हा तर प्रत्येकाच्या नशिबाच्या भाग. नशिबात असेल तर ते कसेही मिळेल पण जर नशीबातच नसेल तर प्रयत्न करून सुद्धा कधी कधी अपयशच येते. पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न अपयशी ठरले, कमी पडली ती प्रबळ इच्छा शक्ती. त्या अपयशातून सुद्धा शिकण्यासारखे भरपूर असते जे पटकन मिळालेल्या यशात देखील सापडत नाही.
यावर वाचनात आलेला एक लेख तर फारच आवडला ;

"चन्द्रगुप्त नी विचारले
जर नशिब आधीच लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा..?

चाणक्य म्हणाले काय माहित नशिबात लिहिले असेल कि प्रयत्न केले तरच मिळणार."
हे सगळं फक्त मनात येणाऱ्या विचारांवर अन पाहण्याचा दृष्टिकोनावर अवलंबून असते. जर आपण येणाऱ्या विचारांची जर नेहमी तुलना करत राहिलो तर मात्र सगळंच अवघड होऊन बसतं. अन गोंधळ , त्रास होतो तो तर वेगळाच. कधी कधी गेलेली संधी पुन्हा नक्की मिळेल अन एकदा गेलेली वेळ कधीच पुन्हा येत नाही.फक्त आलेल्या संधीची आणि मनात सूरु असणाऱ्या गोंधळाची सरमिसळ होता कामा नये. वेळ ही नेहमीच नवीन संधी घेऊन येत असते. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य इच्छाशक्ती ठेवून त्या संधीचा फायदा ज्याला घेता येतो तो नक्कीच पुढे जातो यशस्वी ठरतोच. गरज असते ती सकारत्मकता,इच्छाशक्ती, कष्ट आणि मानसिकतेची. ह्या गोष्टी जर मनात कायम असतील तर नेहमीच आनंदी, उत्साही राहायला मदत होईल. न यामुळे नक्कीच चांगल्याच गोष्टी घडतील.
आणि हो प्रयत्न ते तर शेवट पर्यंत मनापासून केलेच पाहिजेत, यश तर मिळेलच आणि जरी अपयश आलचं तरी न खचता पुढे गेले पाहिजे कारण आलेलं अपयश हे नक्कीच काहीतरी शिकविणारे असेल आणि पहिल्यापेक्षा अजून चांगली संधी नक्कीच घेऊन आलेलं असेल.
'बाकी सगळं नशिबावर आहेच....'
असो हे झालं माझं मत अन अनुभव. पण हे कितपत योग्य आहे , उपयोगी आहे ह्याचा नक्कीच मनापासून विचार करण्या सारखं आहे....

Loved the way you quote Chandragupta and chankya's example. Looking forward to more blogs. Keep writing ✨
उत्तर द्याहटवा